पोस्ट्स
❤️🦋आई ,मां , अंम्मी , Mother❤️
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हृदयाच्या पहिल्या पानावर आई हेच नाव असते.. देवाच्या वरती सुद्धा तुझं नेहमी स्थान असते.. मधमाशीच्या शहदा ला सुद्धा फिके पाडणारे एवढे गोड तुझे स्वर असते.. मुलांवर चांगले संस्कार घडावे नेहमी याच धडपडीत असते.. तिरस्कार करणाऱ्या जगामध्ये प्रेमाचा महासागर मात्र तुझा दरवळतो अंधारलेल्या आयुष्यामध्ये तुझ्यामुळेच प्रकाश पसरतो वाटते नेहमी मला भीती आई ! या जन्मी तुझे ऋण फेडू शकणार की काय ? तुझा हसरा चेहरा ठेवण्यासाठी माझे प्रयत्न पुरे पडणार की नाय ... शेवटी ईश्वराचरणी एवढीच माझी माफी आहे नको वारी मला कोणत्या पंढरपूर यात्रेची साक्षात घरामध्ये जोडी आहे माझ्या विठोबा रखुमाई ची❤️